Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दंगा करताना हटकले अन हवालदारावर कोयत्याने वार
    क्राईम

    दंगा करताना हटकले अन हवालदारावर कोयत्याने वार

    editor deskBy editor deskJuly 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा : वृत्तसंस्था

    सातारा बसस्थानकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरुणांना हटकल्याने एका तरुणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काखेत कोयत्याने वार केले. यामध्ये पवार जखमी झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चौकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरुण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याचे त्यांना प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणांना त्यांनी हटकल्यानंतर तेथून दंगा करणारे तरुण निघून गेले. सुमारे पंधरा मिनिटांनंतर मोपेड दुचाकीवरून चौघेजण पुन्हा त्या ठिकाणी आले आणि पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरुणाने त्यांच्या काखेत कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरुण मोपेडवरून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही पवार यांनी त्यांचा पाठलाग केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.