सांगली वृत्तसंस्था । राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर.आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकरणात जोरदार एन्ट्री झाली आहे. विरोधकांना रोहित आर आर पाटील यांनी विरोधाकांना बाप दाखविला आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ येथील निवडणुकीच्या प्रचारात रोहित पाटील यांची तोफ धडाधडताना पहिल्यांदाच दिसली. रोहित पाटील यांनी आक्रमक भाषणं करून विरोधकांना नामोहरम केल्याचे दिसून आले. निवडणूक प्रचारातील त्यांची भाषणंही चांगलीच चर्चेचा विषय झाली. खासकरून त्यांनी विरोधकांना त्यांचा बाप दाखवण्याचे केलेले विधान तर अधिकच चर्चेत ठरले आहे. यावेळी अनेकांना आरआर आबा पाटील यांची छबीच रोहित यांच्यात दिसत होती.
विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केले होते.
राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत. या विजयानंतर आर. आर. पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी रोहित यांचं औक्षण केलं. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हाच फोटो ट्विट करत रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी रोहित पाटील यांना दिल्या आहेत.