लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । लपून छपून रात्री आंदोलन न करता मर्दाची औलाद असेल तर दिवस आंदोलन करून दाखवा असा सवाल शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला असून भ्याड आंदोलनाचा निषेध व्यक्त केला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी कायदाव्यवस्थेचा भंग करीत मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकरीत एक प्रकारे आपला भ्याडपणा निदर्शनास आणला आहे. आंदोलन करा, पण निदान काही सामाजिक भान ठेवून करावे, पालकमंत्री कोरोना बाधित असतांना मध्यरात्री असे चोरासारखे येऊन आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे. मर्दाची औलाद असता तर रात्री आंदोलन न करता दिवसा आंदोलन करून दाखवा असा सवाल करत अश्या भ्याड आंदोलनाचे धरणगाव शिवसेनातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन धरणगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी निवेदन देवून केला आहे.
या प्रसंगी शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, तालुका शहरप्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन गटनेते पप्पू भावे, विभाग प्रमुख संजय चौधरी, वासुदेव चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, सुरेश महाजन, धिरेंद्र पुरभे, संतोष महाजन, बाळासाहेब जाधव, रवी जाधव, भैयाभाऊ महाजन, दिनेश येवले, राहुल रोकडे, विनोद रोकडे, अरविंद चौधरी यांच्यासह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.