• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘त्या’ खुनातील दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

editor desk by editor desk
July 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
‘त्या’ खुनातील दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे याचा तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना २३ मे रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाठलाग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते मालवण पोलीसांनी अटक केली आहे. निलेश युवराज सपकाळे (वय ३५, रा. शनिपेठ, जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (वय ३०, रा. श्रीराम नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे २३ मे २०२४ रोजी किशोर सोनवणे या तरूणाचा जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. ही संपुर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील दोन संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे आणि अमोल छगन सोनवणे हे फरार होते. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना या खून प्रकरणातील संशयित आरोपी निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे हे दोघो सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यांमध्ये आजगाव येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली.

जळगाव पोलीसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीसांनी आजगाव येथे जावून जाऊन संशयित आरोपींची माहिती घेतली. पोलीसांचा सुगावा लागल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी हे मालवणच्या दिशेने पसार होत असतांना पोलीसांनी दोघांचा पाठलाग करून अटक केली. सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली व दोघांना जळगाव एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले असून पथक जळगावला येण्यासाठी निघाले आहे.

Previous Post

मोठी बातमी : राज्याला मिळाले नवे राज्यपाल !

Next Post

धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group