पारोळा : प्रतिनिधी
महामार्गावर सायंकाळी सुमारास ट्रक- पिकअप वाहन यांच्यात अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र कौतिक बागुल (५०, नगरदेवळा, ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विचखेडे शिवाराजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारा ट्रक (एमएच१५/ जीव्ही ७८२७) हा भरधाव वेगाने चालत असताना धुळ्याकडून पारोळ्याकडे येणाऱ्या पिकअपने (एमएच१९/ सीवाय५०७६) ला जोरदार धडक दिली. त्यावरील चालक रफिक अहमद शरीफ अहमद (४०, धुळे), पूजा राजेश बागुल (२५, सिद्धार्थ नगर, पारोळा), अखिल अहमद अब्दुल सत्तार (धुळे) हे जखमी झाले तर रवींद्र कौतिक बागुल (५०, नगरदेवळा, ता. पाचोरा) यांचा जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार व गावकऱ्यांनी जखमींना कुटीर रुग्णालयात दाखल केले.