चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील विष्णापूर येथील एका पत्रीशेड असलेल्या घरावर छापा टाकून ११ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. यात एकास अटक करण्यात आली. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. सायसिंग बरकत बारेला (३६, रा. विष्णापूर) असे या अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विष्णापूर येथील सायसिंग बारेला हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किमतीचा गांजा तसेच ६ हजार रुपये किमतीचा वजन काटा व मोटारसायकल जप्त केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अनवर तडवी हे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अडावद परिसरात गाजांची तस्करी सुरू होती.
त्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. अडावदचे सपोनि संतोष चव्हाण, पोउनि राजू थोरात, पोहेकॉ. भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतीश भोई, भूषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली