मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असतांना नुकतेच नवी मुंबईच्या बेलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सेक्टर 19 मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. पहाटे 4.30 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे मोठी जीविहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडण्याआठी काही लोकांनी इमारतीतल रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळल्याचीमाहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाळी अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
बेलापूर परिसरातील शहाबाज गावात 4 मजली रहिवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक सलून आहे. शनिवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारतीत कंपण होत असल्याचे जाणवले. त्याने तातडीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी इमारतीतील तिन्ही मजल्यावर असलेल्या रहिवाशांना तातडीने बाहेर काढले.