Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव पोलीस ठाण्यात दबंग पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती
    क्राईम

    धरणगाव पोलीस ठाण्यात दबंग पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती

    editor deskBy editor deskJuly 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    धरणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांची जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आले असून त्यांच्या जागी नागपूर येथील पवन देसले यांची पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नागपूर नंतर पहिल्यांदाच पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

    पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पदभार घेऊन उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई. धुळे. नागपूर अँटी करप्शन विभाग, जळगाव जिल्ह्यातील, मेहूणबारे आणि नागपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना बढती देऊन धरणगाव येथे पोलीस ठाण्याचा प्रभारीपद म्हणून पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पवन देसले यांनी जिल्ह्यात पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतांना त्यांनी अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला होता. त्यामुळे त्यांची डॅशिंग व दंबग पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली. आता पुन्हा धरणगाव येथील पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी मिळाल्याने ते आपल्या कामातून मिळालेल्या संधीचे सोने करतील.

    जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी२६ जुलै रोजी रात्री काढले आहे. त्यामध्ये पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.