बोदवड प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागातील जागांसाठी आज मतमोजणी करण्यात आली. आतापर्यंत १२ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून या निकालात शिवसेनेने ७ जागांवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तर राष्ट्रवादीला ७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना त्यांच्याच होमग्राऊंडला जोरदार धक्का बसला आहे. तर भाजपला ईश्वरचिठ्ठीने एक जागा मिळविली आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात आज निवडणूकीनंतर मतमोजणी करण्यात आली. बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीपासून राष्ट्रवादीने आघाडी ठेवली होती. भाजपाला केवळ एक जागेवर समाधान मानले असून मुक्ताईनगर मतदार संघ असलेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारांनी नंतरच्या फेरींमध्ये बाजी पलवली.
बोदवड नगरपंचायतीच्या निकालात १७ जागांवर शिवसेनेला ९ जागा मिळाल्याने होमग्राऊंडवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी उभे केलेल्या उमेदवारांनी जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागांसाठी उमेदवार उभे असतांना केवळ ७ जागा निवडून आणता आले आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी धोबीपछाड केला आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या एकुण १७ जागांपैकी शिवसेना ९, भाजपा-१, राष्ट्रवादी-७ अशी बालाबल आहे.