Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तुम्हाला खर्चाचा बजेट करावा लागणार
    राशीभविष्य

    तुम्हाला खर्चाचा बजेट करावा लागणार

    editor deskBy editor deskJuly 26, 2024No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेष राशी
    आजचा दिवस तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या कामात तुम्ही प्रचंड व्यस्त राहाल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. पण तुमचा खर्चही प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. तुमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नवा पाहुणा आल्याने घरच्यांच्या आनंदाचा पारावार उरणार नाही. अचानक मोठा खर्च उद्भवेल. त्यामुळे बचतीतील पैसा खर्च होईल. तुमच्या सहकाऱ्याला मनातील गोष्ट सांगाल.

    वृषभ राशी
    आजचा दिवस व्यस्ततेत जाईल. घरच्यांची तुमच्यावर जबाबदारी असल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. तुम्हाला नव्या कामाची सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नाही तर पोटदुखी, गॅस, अपचन आदी समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला दूरच्या नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
    मिथुन राशी
    आज तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत मनासारखं काम करायला मिळाल्याने आनंदाला पारावार उरणार नाही. मिळालेलं काम तुम्ही वेळेत पूर्ण कराल. मुलीला शाळेत पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण घरात आनंदी वातावरण राहील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना त्यांच्या कामामुळे नवीन ओळख मिळेल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. बोगस लोकांपासून सावध राहा. मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

    कर्क राशी
    आजचा दिवस तुम्हाला वायफळ खर्च करावा लागणार आहे. तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत. एखाद्या नव्या कामाप्रती तुमची रुची जागृत होऊ शकते. विद्यार्थी एखाद्या क्रीडा स्पर्धेत भाग घेतील. कुटुंबातील वाद दूर होतील. सासरवाडीतील एखाद्या व्यक्तीकडून अचानक गिफ्ट मिळेल. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने संपत्ती वाढ होईल. वडिलोपर्जित संपत्तीचा वाद डोकेदुखी वाढवेल. कुणाशीही उधार उसनवारी करू नका. नाही तर पैसा अडकून पडण्याची शक्यता आहे.

    सिंह राशी
    आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. घरी पूजापाठ आयोजित कराल. कुणालाही पैसा उधार देताना विचार करूनच द्या. कुटुंबात काही कामांबाबत असमंजसपणा निर्माण होईल. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. एखाद्याचं लग्न होण्यात अडथळा येत असेल तर हा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत काहीवेळ एकांतात घालवाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

    कन्या राशी
    आजचा दिवस संमिश्र असा आहे. एखाद्या कारणावरून घरात वाद होतील. बऱ्याच काळापासून रेंगाळलेलं एखादं काम यावेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं सहकार्य मिळणार नाही. तुम्ही ठरवलेली कामे मार्गी लागतील. लोकांचं भलं व्हावं असं तुम्हाला मनापासून वाटेल, पण हा तुमचा स्वार्थीपणा आहे, असं तुम्हाला वाटेल. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवाल. व्यवसायात बरकत येईल.

    तुळ राशी
    आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा जाईल. कोर्टकचेरीच्या प्रकरणात सावध राहा. कुणावरही गाफिल राहू नका. एखादं काम दुसऱ्यावर सोपवून गाफिल राहू नका. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचं प्लानिंग कराल. कुटुंबात एखादा लग्न सोहळा होईल. पुराच्या पाण्यामुळे कधीही भरून न निघणारं नुकसान होईल. आज तुम्हाला एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

    वृश्चिक राशी
    आजच्या दिवशी तुम्हाला मानसन्मान मिळेल. संपत्तीत वृद्धी होईल. मामाकडून अचानक धनलाभ होईल. वडिलांशी कुटुंबातील समस्यांवर चर्चा कराल. व्यवसायात नवा पार्टनर घेण्याची वेळ येईल. पण पार्टनरशीप करताना लिखापढी करा. एखादं काम वेळेत पूर्ण न झाल्याने मन त्रस्त होईल. कामानिमित्ताने दूरचा प्रवास होईल. जीभेवर नियंत्रण ठेवा. नाही तर होणारं काम होणार नाही.

    धनु राशी
    आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. तुम्हाला खर्चाचा बजेट करावा लागणार आहे. अचानक मोठा खर्च होईल. इच्छा नसतानाही केवळ मजबुरी म्हणून तुम्हाला खिशाला भुर्दंड पडणार आहे. जीवनसाथीच्या आरोग्याची चिंता वाटेल. कोणतंही नवं काम हाती घेताना आधी आर्थिक स्थिती पाहून घ्या. मगच नव्या कामाला हात लावा. नाही तर नंतर समस्या निर्माण होईल.

    मकर राशी
    आजच्या दिवशी मोठी गुंतवणूक कराल. पण गुंतवणूक करताना विचार करूनच निर्णय घ्या. विचार न करता एखादं पाऊल उचलाल तर पश्चाताप होईल. तुम्हाला तुमच्या एखाद्या संपत्तीतून डबल फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. परदेशात जाण्याचा योग आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना कामात नवीन जबाबदारी मिळेल. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्यांमधील दूरावा दूर होईल.

    कुंभ राशी
    जीभ आणि व्यवहार यावर आज नियंत्रण ठेवा. नाही तर सर्वच पाण्यात जाईल. कोणतीही गोष्ट धैर्याने पुढे न्या. नाही तर समस्या वाढतील. आर्थिक गोष्टींचा आज फटका बसण्याची शक्यता आहे. तुमचे वायफळ खर्च तुमच्याच अंगलट येतील. कोणताही आर्थिक व्यवहार लिखापढीशिवाय करू नका. व्यवस्थित दस्ताऐवज करा. घर खरेदीचा योग आहे. भाडेकरूकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

    मीन राशी
    आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्तम जाणार आहे. एखाद्या प्रॉपर्टीशी संबंधित काम मार्गी लावल्याने तुम्हाला चांगला धनलाभ होईल. जीवनसाथीसोबतची कटुता दूर होईल. उद्योगात नव्या तंत्रज्ञानाचा वापर कराल. त्यामुळे आर्थिक फायद्याचे मार्ग मोकळे होतील. काही नव्या लोकांशी संबंध प्रस्थापित कराल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुणाच्या तरी सांगण्यावरून एखादा निर्णय घेऊ नका. मनाला पटेल तो निर्णय घ्या. आज तुमच्या न्यायबुद्धीचा कस लागेल. लेण्यांच्या ठिकाणी जाण्याचा योग आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आज, तुम्ही पूर्वी पूर्ण केलेल्या छोट्या कामांचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील.

    March 20, 2026

    आज तुम्हाला व्यवसायानिमित्त राज्याबाहेर प्रवास करावा लागू शकतो.

    March 19, 2026

    कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत लागून राहिलेली चिंता आता हळूहळू दूर होईल.

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.