Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा ; जरांगे पाटलांची टीका !
    राजकारण

    छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा ; जरांगे पाटलांची टीका !

    editor deskBy editor deskJuly 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नेहमीच उपोषण करीत राहिले आहे. मनोज जरांगे पाटलांनी आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

    मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा गेंडा म्हणून केला. ते म्हणाले, येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाही. प्रसाद लाड बोलत आहेत, पण फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. दरेकरांच्या चकाट्या ऐकण्यास मला वेळ नाही. आपले गोरगरीब फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसायचे, पण ते उत्तर देत नाहीत. माझ्यावर टीका हा त्यांच्या अभिनयाचा भाग आहे. राणे साहेबांवर मी बोललो नाही. त्यामुळे त्यांनी नीलेश व नीतेश या दोन्ही मुलांना समजून सांगावे. कारण, माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. इतर नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत. मी सरकारवर विश्वास ठेवला, पण हे बिलिंदर लोकांना मध्ये टाकत आहेत. मला ट्रॅप केले जात आहे. फडणवीस हेच खरी सत्ता चालवत असून, यामुळेच भाजपचे वाटोळे होत आहे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.