अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या बस मध्ये 44 प्रवासी होते. या आगीत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. महामार्ग क्रमांक सहा वरील तुषार हॉटेल जवळ ही घटना घडली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची शिवशाही बस संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या शेगाव येथून अकोल्याकडे रवाना झाली होती. यादरम्यान चालकाला अचानक काहीतरी जळण्याचा वास आला. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. आणि तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर बसने घेतलेला पेट आणखीनच वाढला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बस मध्ये त्यावेळी 44 प्रवासी होते. मात्र, चालकाच्या सतर्कमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने बस रस्त्याच्या कडेला लावून प्रवाशांना खाली उतरवले. मात्र, तोपर्यंत आगीने भडका घेतला होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मध्ये असलेले सिलिंडरच्या माध्यमातून चालकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या साठी काही नागरिकांनी देखील मदत केली. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. पाहता पाहता बसने पेट घेतला होता. बसचे संपूर्ण सीट जाळून खाक झाले आहेत.