Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बोदवड निवडणूक : शिवसेना ६, राष्ट्रवादी ५ तर भाजपा १ जागेवर विजयी
    बोदवड

    बोदवड निवडणूक : शिवसेना ६, राष्ट्रवादी ५ तर भाजपा १ जागेवर विजयी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या आज मातमोजणीत पहिल्या जागांचे निकाल जाहीर झाले असून यात शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँगेसला ५ आणि भाजपाला १ जागा मिळाल्या आहे.

    प्रभाग क्र. १ – विजयी उमेदवार रेखा सोनू गायकवाड (४६६) मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) , भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) मिळाली

    प्रभाग क्र. २- राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील (३३७) मते मिळवून विजयी, शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३), भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळून पराभूत झाले.

    प्रभाग क्र.३ – राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर (४०५) मते मिळून विजयी, शिवसेनेच्या सुजाता खेवलकर (३८५ मते) भाजपच्या कविता जैन यांना (१६४ मते) मिळून पराभूत.

    प्रभाग क्र. ४ – राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद (५११)मते मिळून विजयी, शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम (२११ मते) पराभूत.

    प्रभाग क्र.५- गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना सारखे ३७४ मते मिळाली. ईश्‍वरचिठ्ठीने भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी.

    प्रभाग क्र.६- शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन (३०२ मते) विजयी, राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (२९६ मते ) मतांनी पराभूत.

    प्रभाग क्र.७ – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी (२४४) मतांनी विजयी, शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मतांनी पराभूत

    प्रभाग क्र. ८ – राष्ट्रवादीच्या एकताबी शेख लतीफ (४३१) मतांनी विजयी, संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) मतांनी पराभूत.

    प्रभाग क्र ९- शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील (४०६ ) मतांनी विजयी, तर राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळाल्याने पराभूत

    प्रभाग क्र.१०- शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर विजयी तर रेखा कैलास चौधरी यांचा पराभव.

    प्रभाग क्र.११- शिवसेनेचे उमेदवार बेबी रमेश भोई (४३९) मतांनी विजयी तर भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा (३११) मतांनी पराभव.

    प्रभाग क्र. १३- शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे (५५६) मतांनी विजयी झाले आहे.

    विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आनंद व्यक्त करण्यात आला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    महाविकास आघाडी फुटली : कॉँग्रेस लढणार स्वबळावर !

    November 16, 2025

    ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई आमचीच : ठाकरेंच्या विधानाने चर्चेला उधान !

    November 15, 2025

    “जो जीता वही सिकंदर : फडणवीसांचा शरद पवारांना करारा टोला !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.