लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आसोदा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ४ मध्ये एका जागेसाठी तिरंगी लढत झाली. आज मंगळवारी १८ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले असून ७० टक्के मतदान झाले.
सविस्तर माहिती अशी की, जानेवारी २०२१ मध्ये आसोदा ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूकी एक व्यक्ती दोन जागेवर निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा एका जागेसाठी मंगळवार १८ जानेवारी रोजी वार्ड क्रमांक ४ साठी सर्वसाधारण स्त्री राखीव या मतदारसंघातून सार्वजनिक विद्यालयात मतदान घेण्यात आले. यात १ हजार ५५० मतदारांपैकी १ हजार ८८ जणांनी मतदान केले आहे. त्याप्रमाणे एकुण मतदार ७० टक्के मतदान झाले आहे.
एका जागेसाठी ४ जणांनी उमेदवार रिंगणात उभे होते. यातील एक उमेदवार सुनिता वसंत चौधरी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली होती. परंतू त्यांनी निवडणूकीचा कोणताही प्रचार केला नाही. याबाबत त्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता आपण गावाच्या विकासासाठी व एकात्मतेसाठी प्रचार केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे एका जागेसाठी तिरंगी लढत झाली. सार्वजनिक विद्यालयात शांततेत मतदान झाले. यावेळी जळगाव तालुका पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होत. बुधवार १९ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून निकालाकडे नागरीकांची उत्सुकता लागली आहे.