Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुण रात्री घरातून गेला अन सकाळी आढळला मृतदेह
    क्राईम

    तरुण रात्री घरातून गेला अन सकाळी आढळला मृतदेह

    editor deskBy editor deskJuly 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रात्री घरातून गेलेल्या सोनू राजू बनसोडे (२७, रा. समतानगर) या तरुणाचा मृतदेह समता नगरातील एका विहिरीत आढळून आला. पाण्यावर चपला तरंगताना दिसल्याने बुधवारी (२४ जुलै) सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली.

    सविस्तर वृत्त असे कि, आई व बहिणीसह समतानगरात राहणारा सोनू बनसोडे हा तरुण मंगळवारी (२३ जुलै) रात्री ११ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. बुधवारी (२४ जुलै) सकाळी ७ वाजता समता नगरातील विहिरीत चपला तरंगताना दिसल्या. त्यामुळे या ठिकाणी काही जणांनी गर्दी केली होती. या चपला सोनूच्याच असल्याचे त्याच्या आईने ओळखले. त्यानुसार पोहणाऱ्यांनी विहिरीत उडी घेऊन पहिल्याच प्रयत्नात सोनूला बाहेर काढले. त्याला पाहून आईने आक्रोश केला.

    परिसरातील तरुणांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.