लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील चिंचपुरा येथे भरधाव रूग्णवाहिकेच्या धडकेत म्हैस जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरीकांनी रास्ता रोको केल्यामुळे रस्त्यावरीन दोन्ही बाजूने वाहतूकीचा खोळंबा झाला होतो.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे भरधाव वेगाने जाणारी रूग्णवाहिकेने दोन म्हशींना जोरदार धडक दिली. या धडकेत एक म्हैस जागीच ठार झाली तर दुसरी जखमी झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको केलेा. त्यामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहतूकीचा पुर्ण खोळंबा झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पथकातील सपोनि श्री. अहिरे आणि पोहेका विनोद संदानशिव यांनी घटनास्थळी घेतली. यावेळी नागरीकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.
रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावे अशी मागणी केली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन दिवसाच्या आत काम करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तीन दिवसात रस्त्यावर गतीरोधक बसले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी लाइव्ह महाराष्ट्र न्यूज बोलताना दिला आहे.