जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद जवळील एका गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. २१ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत असे कि, जामनेर तालुक्यातील एका गावातील दाम्पत्य नशिराबाद जवळील एका गावात राहण्यासाठी आले होते. दि. २१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास त्या दाम्पत्याच्या पंधरा वधींच मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे हे करीत आहे.