पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील खोलचर येथे मुलास मारहाण केल्याप्रकरणी वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तिघांनी बाप-लेकास मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील खोलचर येथे दि. २१ रोजी रामचंद्र भट्टू हटकर यांच्या मुलास काही कारण नसताना गावातील शिवाजी सजन हटकर, अरुण शिवाजी हटकर, भुरा शिवाजी हटकर (सर्व खोलचर, ता. पारोळा) यांनी मारहाण केली होती. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. याचे वाईट वाटल्याने मंगळवारी सकाळी ९ वाजता पुन्हा या तीन जणांनी रामचंद्र हटकर यांना लाकडी दांड्याने मारहाण केली व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.