• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

या राशीतील लोकांना कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार !

आजचे राशिभविष्य दि २४ जुलै २०२४

editor desk by editor desk
July 24, 2024
in राशीभविष्य
0
या राशीतील लोकांना कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार !

मेष राशी
आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या स्त्रोतावर लक्ष द्याल. शेजाऱ्यांसोबत वाद घालू नका. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमचं मन एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त असेल. घरात एखाद्या कारणावरून वाद होऊ शकतो. जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करताना मित्रांचा सल्ला घ्या.

वृषभ राशी
आजचा दिवस तुम्हाला प्रसन्न करेल. तुम्हाला तुमच्या कामांबाबत सचेत राहावं लागणार आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होणार आहे. वडिलांनी एखादा सल्ला दिल्यास त्याची अंमलबजावणी करा. विनाकारण कोणतीही रिस्क घेऊ नका. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची आतापासूनच तयारी करा. नंतर परीक्षा कठिण जाणार नाही. आज अधिकचा खर्च होईल. प्रेमीयुगलांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाईल. शेतीसंबंधित कामे मार्गी लावाल.

मिथुन राशी
आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कामांचा आराखडा तयार करावा लागणार आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. तुम्हाला तुमच्या खर्चांवरही लक्ष द्यावं लागणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुरू असलेल्या समस्यांमधून सुटका होईल. एखाद्याला वचन दिलं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीला शारीरिक कष्ट झाल्याने तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे.

कर्क राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या कामकाजावर ध्यान द्यावं लागणार आहे. संपत्तीशी संबंधातील वाद मिटेल. तुम्हाला देवाणघेवाण करताना प्रचंड सावध राहावं लागणार आहे. नव्या व्यक्तींच्या संपर्कात याल. त्यामुळे तुमचा व्यवसाय विदेशापर्यंत जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना काही विषयात बदल करायचा असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यसनांपासून सावध राहा. वाहने जपून चालवा.

सिंह राशी
आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. एखाद्या कामामुळे तुम्ही त्रस्त असाल तर हा त्रास दूर होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे बोल मनाला लागतील. त्यामुळे तुम्ही दिवसभर नाराज राहाल. अविवाहितांची भविष्यातील जीवनसाथीशी भेट होईल. प्रिय व्यक्तीशी भांडण कराल. त्यामुळे प्रकृती खराब होईल. पावसाळी आजारांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी कुणावरही विसंबून राहू नका.

कन्या राशी
आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. तुम्ही एखादं नवं पद मिळवाल. तुमची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. अनोळखी व्यक्तींवर अधिक विश्वास टाकू नका. धार्मिक कार्यात मग्न राहाल. त्यामुळे मन:शांती राहील. भंगारचा धंदा करणाऱ्यांना अचानक लाभ होईल. काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून दूर राहा. जीभेवर नियंत्रण ठेवा. मनाचा समतोल ढळू देऊ नका.

तुळ राशी
आजचा दिवस तुम्हाला सुखसमृद्धीचा जाणार आहे. सासरच्या लोकांशी आर्थिक व्यवहार करू नका. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना आज नवे मित्र भेटतील. तुम्हाला तुमच्या वेळेचा सदुपयोग करावा लागेल. इकडे तिकडे भटकून वेळ वाया घालवू नका. तुमचे विरोधक तुमचा जळफळाट करतील. तुम्ही तुमच्या योजनांवर पूर्ण लक्ष द्याल. गावाकडे जाण्याचा योग आहे. वाहने जपून चालवा. नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न कराल. ऑफिसात नव्या वस्तूंची खरेदी कराल.

वृश्चिक राशी
आजच्या दिवसात तुमचे बरेच सोर्स वाढतील. तुमच्या मित्रांकडून एखादी आनंदाची बातमी कळेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची मदत मिळेल. दूर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. तुम्हाला तुमची दिनचर्या चांगली ठेवण्यासाठी वेळ काढावा लागणार आहे. पत्नीचा जुना आजार डोकं वर काढेल. आईवडिलांना भेटण्याचा योग आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना आनंद वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशी
आजच्या दिवशी दिर्घकाळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. बिझनेसमधील एखादी योजना मार्गी लागेल. तुमचा एखादा सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतो. पैशाच्या बचतीबाबत भविष्यातील प्लानिंग करू शकता. गुंतवणूक करून ही बचत करण्याचा प्रयत्न असेल. एखाद्या सरकारी योजनेत पैसे गुंतवल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील. कोर्टकचेरीच्या प्रकरणातून मुक्त व्हाल.

मकर राशी
आजचा दिवस व्यस्ततेत जाईल. आर्थिक विषयात विचार करूनच निर्णय घ्या. खर्च करताना दहा वेळा विचार करा. भपका दाखवण्याच्या नादात तुमचा वायफळ खर्च होऊ शकतो. कामाबरोबरच कुटुंबातील सदस्यांसाठीही वेळ काढावा लागेल. जीवनसाथीबरोबर आज वाजण्याची शक्यता आहे. नको असलेल्या गोष्टी टाळा. वाहन खरेदी करण्याची इच्छा पू्र्ण होईल. गावाला जाण्याचा बेत आखाल.

कुंभ राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. व्यवसायात मनासारखा लाभ मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला ढोरमेहनत घ्यावी लागणार आहे. नोकरी करणारे दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न कराल. तुम्हाला यश आणि कीर्ती मिळेल. तुमच्या आसपासच्या शत्रूंपासून सावध राहा. वैवाहिक जीवन सुखी राहील. प्रेयसीच्या एका महत्त्वाच्या कामात मदत होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. दूरचा प्रवास करण्याचा बेत अचानक रद्द करावा लागेल. परदेशातून पुन्हा मायदेशी आगमन होईल.

मीन राशी
आजच्या दिवशी तुम्हाला भौतिक सुख सुविधा मिळतील. तुम्ही नव्या लोकांशी मिळूनमिसळून राहण्याचा प्रयत्न कराल. हीच मंडळी तुम्हाला नव्या व्यवसायात मदत करतील. मुलाला नोकरीत अडचणी येतील. त्यामुळे तुम्ही थोडे त्रस्त राहाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जे लोक इलेक्ट्रॉनिकचं काम करतात त्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पार्टनरशी एखादी गोष्ट लपवून ठेवाल.ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असेल. त्यामुळे नात्यात वितुष्ट येऊ शकतं. सासूरवाडीला जाण्याचा योग आहे.

Previous Post

ग्राहकांना आनंदाची बातमी : दोन तासात ३ हजाराने सोने स्वस्त !

Next Post

गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

Next Post
गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ म्हणत ई-सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !
क्राईम

भाजप नेत्यांच्या बुडाला लागली आग ; उद्धव ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल !

July 7, 2025
ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !
राजकारण

ठाकरे बंधुंनी उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं ; भाजप खासदार आक्रमक !

July 7, 2025
राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !
कृषी

राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना सरकार टाकणार काळ्या यादीत !

July 7, 2025
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !
राजकारण

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा !

July 7, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

July 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

वृद्ध महिलेचा कपड्याने बांधून घरातून लांबविला मुद्देमाल !

July 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group