मुंबई : वृत्तसंस्था
देशातील मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला असून यात त्यांनी विविध क्षेत्रासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु, सर्वसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयाने झाली आहे. त्यामुळे जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम देखील दिसून आला आहे. अवघ्या दोन तासांमध्ये प्रति तोळा 3 हजारांनी सोनं स्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णयाची घोषणा होताच अवघ्या दोन तासांमध्ये जळगाव व पुण्यातील सराफा बाजारात परिणाम दिसायला लागले. सोन्याच्या दरात अवघ्या दोन तासात 3 हजार रुपयांची घट झाल्याचे पाहून ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ज्याप्रमाणे लगीनसराईत सोनं खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या असतात. परंतु आज झालेल्या निर्णयामुळे सराफा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे अनेक दुकानदारांनी सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. याआधी सोने-चांदीचे सीमा शुल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट निम्मे केले केल्याने सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. प्रतितोळा सोन्यामागे तब्बल 2 हजार रुपयांची घट झाल्याचं सांगितले जात आहे.