प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । तालुक्यातील पिंप्री खूर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात मंगळवारी धरणगाव तालुका आरोग्य विभागाच्यावतीने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे हे उपस्थित होते. त्यांनी कोरोना बाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातून आपोआपच इतरांचे आरोग्य जोपासले जाते असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मयूर हिवरकर, आरोग्य सेविका आशा लोखंडे, पुष्पा पढयार, कविता चौधरी, आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक नंदू चौधरी आदी सर्व उपस्थित होते . सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.
यावेळी पालकवर्ग वैशाली अहिरे, मालती पाटील आदी उपस्थित होते. लसीकरण यशस्वीतेसाठी व्ही.एम. चौधरी, आर. आर. पावरा, आर.एस.पाटील, एस.के.शिंदे, एस.ए पटेल, जे.एस.पाटील, सचिन पवार, लिपिक सौरभ देसले, कर्मचारी सुदर्शन चव्हाण, अविनाश पाटील आदींनी कोविड नियम पालन करत लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर.एस.पाटील यांनी केले.