जळगाव : प्रतिनिधी
दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या उदय रमेश मोची वय २६, रा. रामेश्वर कॉलनी हा कुठलेही परवानगी न घेता घरी मिळून आला. यापक्ररणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीतील बांधाजवळील उदय मोची याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परंतु त्याने पोलीस अधीक्षक किंवा शासनाची कुठलीही परवानगी न घेता, तो शहरातील त्याच्या घरी आलेला होता. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, तो घरी मिळून आला. याप्रकरणी त्याने पोलीस अधीक्षक यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी किरण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित उदय रमेश मोची याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.