• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना आज अचानक धनलाभ होणार !

आजचे राशिभविष्य दि २३ जुलै २०२४

editor desk by editor desk
July 23, 2024
in राशीभविष्य
0
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

मेष राशी
मेष राशीच्या लोकांनी आज जपून व्यवहार करावा. मन अशांत राहील. मानसिक आरोग्य टिकवून ठेवा. अध्यात्मामध्ये रस घेतल्यास मनाला शांती मिळेल. कला आणि संगीत क्षेत्राशी निगडीत असणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ जाईल. तर उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना आज अचानक धनलाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग आहे. वाहन जपून चालवा. रिलेशनशीपमध्ये वाद दूर होतील.

वृषभ राशी
आजचा दिवस चढउताराचा असेल. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लान कराल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करावी लागणार आहे. भावांचं सहकार्य मिळेल. तणावापासून दूर राहा. लव लाईफमधील अडचणी सबुरीने सोडवा. आर्थिक प्रकरणात सावधानता बाळगा. मोठी रक्कम कुणालाही उधार देऊ नका. नोकरी शोधणाऱ्याला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. लाइफस्टाईल मेंटन करा.
मिथुन राशी
या राशीच्या लोकांना आज बरीच धावपळ करावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. मनातील अनामिक भीती काढून टाका. ही भीती दूर करण्यासाठी उपाय शोधा. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. व्यस्त कार्यक्रमातूनही कुटुंबीयांना बाहेर घेऊन जाल. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव दूर होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा जाईल. दूरचे नातेवाईक आज घरी येण्याची शक्यता आहे.

कर्क राशी
कर्क राशीचे लोक आज आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेले राहतील. धर्माच्याबाबत श्रद्धेचा भाव बनेल. संतान सुखाची प्राप्ती होईल. खर्चात वाढ होईल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. पोटाच्या विकारासापासून सावध राहा. त्यापासून दूर राहा. धार्मिक कार्यात मग्न व्हाल. वाहन खरेदीचा योग आहे. नोकरीतील हितशत्रूंपासून सावध राहा. आठवडी बाजारात चांगली मिळकत होईल. मन:शांतीसाठी मेडिटेशन करा.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवावं. प्रवासाने दगदग होईल. घरी धार्मिक कार्य पार पडेल. घरातील खर्चात वाढ होईल. व्यवसायात यश मिळेल. शैक्षणिक कार्यात चांगला रिझल्ट येईल. आईकडून मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीची एन्ट्री होईल. रिलेशनशीपमधील गैरसमज दूर होतील. प्रोफेशनल लाइफमध्ये क्रिएटीव्ह व्हाल. आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्याल.

कन्या राशी
आजचा दिवस सामान्य राहील. दिवसाची सुरुवात वैचारिक मतेभदाने होईल. नात्यात कटुता येईल. नात्यात अधिकच दुरावा निर्माण होईल असं काही जीवनसाथीला बोलू नका. नात्यात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. ऑफिसात तुमची बेस्ट परफॉर्मन्स द्या. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक स्त्रोतातून लाभ होईल. मालमत्तेत गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय असेल. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास डॉक्टरांना दाखवा.

तुळ राशी
आजचा दिवस संमीश्र असा जाईल. प्रोफेशनल लाईफमध्ये अधिक प्रोडक्टिव्ह व्हाल. पर्सनल लाइफकडे अधिक लक्ष द्या. जीवनसाथीच्या इमोशन्समुळे भावूक व्हाल. पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवाल. आज प्रेमीसोबत रोमांटिक डिनर किंवा लाँग ड्राइव्हला जाल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. व्यापाऱ्यात अधिक लक्ष द्यावं लागेल.

वृश्चिक राशी
आजचा दिवस सामान्य राहील. लव लाइफमध्ये सर्वकाही व्यवस्थित राहील. संपत्तीवरून काहींशी वाद होतील. रिलेशनशीपमधील अडचणींवर समजूतदारपणे मात करा. विवाहितांनी ऑफिसमधील लफड्यांपासून दूर राहावं. त्यामुळे वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. ऑफिसमध्ये नव्या कार्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार राहा. आर्थिक प्रकरणात कुणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जुनी मालमत्ता विकून धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशी
आज धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल लाइफमधील अडचणी दूर होतील. जीवनसाथीसोबतचं नातं घट्टं होईल. परंतु अहंकारामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. ऑफिसातील तुमच्या कार्याची प्रशंसा केली जाईल. टीम मेंबर्सच्या सपोर्टमुळे करिअरमध्ये यश येईल. परदेशात जाण्याचा योग येईल. पैशाची चणचण दूर होईल. हेल्दी लाइफस्टाईलचा अवलंब करा. कामाच्या ठिकाणी अधिक तणाव घेऊ नका. कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवाल.

मकर राशी
आजचा दिवस खूपच चांगला आहे. प्रोफेशनल लाईफमध्ये यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज जीवनसाथीसमोर तुमच्या मनातील भावना मनमोकळेपणाने व्यक्त करा. रिलेशनशीपमध्ये जुन्या वादावर अधिक चर्चा करू नका. त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. ऑफिसमध्ये अधिक बिझी शेड्यूल असेल. कार्यांची जबाबदारी वाढेल. थोड्याश्या आर्थिक अडचणी जाणवतील. पण संध्याकाळपर्यंत अनेक सोर्सकडून पैसे येतील. जंकफूडपासून दूर राहा. आरोग्य जपा.

कुंभ राशी
आजचा दिवस केवळ शुभच नव्हे तर लाभकारी असणार आहे. ऑफिसातील तुमचा परफॉर्मन्स अधिकच चांगला राहील. लव लाईफमध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. परंतु दिवसाच्या सुरुवातीला पार्टनरसोबत खटके उडतील. क्रशला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहितांच्या विवाहाचे योग जुळून येतील. वाहन खरेदी करण्याचा योग आहे. दूरचा प्रवास होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. लोकलचा प्रवास करताना दगदग जाणवेल. एखाद्या पुस्तकातून प्रेरणा घ्याल.

मीन राशी
आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम मिळेल. लव लाइफमध्ये रोमांचक मोड येईल. पार्टनरसोबत इमोशनल बॉन्ड स्ट्राँग होईल. ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमची प्रतिमा चांगली राहील. कामाच्या ठिकाणी अधिकची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. पिकनिकला जाण्याचा प्लान आखाल. आर्थिक प्रकरणातील निर्णय घेताना चारवेळा विचार करा. कुणावरही अवलंबून राहू नका. मनाला जे वाटेल तेच करा. आरोग्याच्या तक्रारीमुळे मनाला चिंता वाटेल. मन खायला उठेल.

Previous Post

गावठी कट्ट्यासह दोन संशयित अटकेत

Next Post

बापरे : विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू ; चिमुरड्यासह मृतदेह फेकला नदीत

Next Post
बापरे : विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू ; चिमुरड्यासह मृतदेह फेकला नदीत

बापरे : विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू ; चिमुरड्यासह मृतदेह फेकला नदीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हनीट्रॅपमधील मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला  ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

हनीट्रॅपमधील मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला  ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

July 22, 2025
हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !
क्राईम

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !

July 22, 2025
आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान :  आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही
राजकारण

आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही

July 22, 2025
चाळीसगावात पोलीस असल्याचे सांगून महिलेचे १ लाखांच्या दागिन्याची फसवणूक !
क्राईम

चाळीसगावात पोलीस असल्याचे सांगून महिलेचे १ लाखांच्या दागिन्याची फसवणूक !

July 22, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

१३ वर्षीय बालिकेवर अत्याचार : पाच महिन्यांची गर्भवती ; एकाविरोधात गुन्हा दाखल !

July 22, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी अखेर पतीविरोधात गुन्हा दाखल !

July 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp