जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नेरी नाका परिसरात एक संशयित आरोपीला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. गणेश हिमंत कोळी रा. मोहाडी असे आरोपीचे नाव असून त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २१/०७/२०२४ रोजी एका व्यक्तीचा गावठी कट्ट्यासह फोटो प्राप्त झाला, त्यानुसार कारवाई करत पोलिस पथकाने नेरी नाका परिसरात जात तपास सुरु केला, यावेळी त्यांना एक संदिग्ध व्यक्ती निदर्शनास आली, दरम्यान पो.उ.नि चंद्रकांत धनके यांच्या मोबाईल मधील फोटो आणि सदर व्यक्ती एकच असल्याने त्यास तत्काळ पोलिसांनी विचारपूस सुरु केली. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश हिमंत कोळी वय २३ वर्षे रा. मोहाडी, उमेश पार्क ता. जि. जळगाव मुळ रा. धानोरा ता. चोपडा जि. जळगाव असे सांगितले. यावेळी त्याला कट्ट्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दिसताच त्याने सार काही सांगितले. त्याने सांगितले कि, काही दिवसांपूर्वी माझे गावठी कट्ट्यासह फोटो व्हायरल झाले, त्यामुळे तो कट्टा मी माझ्या मित्राच्या शेतात कुट्टी मध्ये लपवून ठेवला आहे. त्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा मित्र विनय जितेंद्र कोळी (३४) रा. मोहाडी ता.जि. जळगाव याला विचारपूस करून सदर 10 हजार रुपये किमतीचा कट्ट्यासहित दोघांना ताब्यात घेत पोकों अनिल कांबळे यांचे फिर्यादी वरुन भारतीय शस्त्र अधीनयम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अंकुश नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या आदेशावरून पो.उप.नि चंद्रकांत धनके, पोकॉ अनिल कांबळे, पो. कॉ मुकुंद गंगावणे, पो.कॉ विकी इंगळे, पो.कॉ रविंद्र साबळे, पोकॉ अमोल वंजारी यांनी केली.