जळगाव : प्रतिनिधी
चोरीच्या आठ दुचाकींसह चोरट्याला गिरड गावातून भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल शांताराम पाटील रा. गिरड ता. भडगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गिरड येथील पंडीत झिपरू बोरसे वय ४७ यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ डीक्यू ५९१५ ही दुचाकी १३ जानेवारी २०२३ रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी त्याच गावातील संशयित आरोपी अमोल पाटील याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलीसांनी त्याला १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता अटक करण्यात आली होती. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीच्या दुचाकीसह इतर ७ अशा एकुण ८ दुचाकी हस्तगत करण्यात आले. त्याने या दुचाक्या मध्यप्रदेश, गुजरात आणि पाचोरा तालुक्यातून चोरी केल्याचे सांगितले.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, विभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शेख डोमाळे, पोहेकॉ रविंद्र पाटील, हिरालाल पाटील, निलेश ब्राम्हणकर, मनोहर पाटील, सुनिल राजपू, प्रविण परदेशी यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.