• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

व्याजाचे पैसे का देत नाही? प्रौढाने संपविली जीवनयात्रा

editor desk by editor desk
July 22, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
व्याजाचे पैसे का देत नाही? प्रौढाने संपविली जीवनयात्रा

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील बोदर्डे येथील 47 वर्षीय प्रौढाने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी उघडकीस आली.

याबाबत मंजुळाबाई मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती संतोष हिरामण मिस्तरी यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार रुपये व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून २० हजारांचे आठवड्याला दोन हजार व १५ हजारांचे महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते. मात्र दोघेही घरी येऊन व्याजाचे पैसे का देत नाही? असे विचारून त्रास देत असत.

तसेच संशयितांनी वेळोवेळी सुतारकाम करण्याचे साहित्य, दुचाकी तसेच घरातील वस्तू उचलून नेल्या आहेत. २० जुलै रोजी सायंकाळी अशोक चौधरी व भालेराव महाजन हे दोघे मिस्तरी यांच्या घरी आले व ‘तू चालू हप्त्याचे व्याज दिले नाही’, असे म्हणू लागले. या वादामुळे संतोष मिस्तरी रात्री उशिरापर्यंत जागे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते रूममध्ये दिसून आले नाहीत म्हणून त्यांची पत्नी मागच्या रूममध्ये गेली असता, त्यांनी मागील रूममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मारवड पोलिस ठाण्यात दोन्ही खासगी सावकारांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

जीवनसाथीसोबत नव्या कामाची सुरुवात कराल !

Next Post

भरधाव धडकेत वृद्ध ठार

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भरधाव धडकेत वृद्ध ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group