पुणे : वृत्तसंस्था
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला. फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा बहुत विजय मिळवला, पण आता विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत, असा हल्लाबोल शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. अमित शहा यांनी केला. कॉंग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. परंतु यांनी 60 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी काय काम केले. हे काहीही करू शकत नाही. आरक्षणाचा अपप्रचार केला. संविधान हटावचा अपप्रचार केला, पण आता त्यांचा प्रचार आता चालणार नाही. लोकांना त्यांचा खोटा अपप्रचार समजला आहे, असेही शहा म्हणाले.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली. याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले. 60 वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. विधानसभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे.
काल रात्री देखील मला कार्यकर्ते भेटले. संभ्रम निर्माण करण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. राम जनमभूमीसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय. कुणीही इतकी वर्ष तिथे पाहिले नाही. आम्ही मंदिर बनवून दाखवलं. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला. आम्ही एक ग्रॅम देखील दूधाची पावडर गेल्या दहा वर्षात आयात केलेली नाही आणि करणार देखील नाही. परंतु दूध पावडर आयातीचा निर्णय हा शरद पवारांचा आहे. त्यांनीच हा अद्यादेश त्यांच्या कार्यकाळात काढलेला आहे. खोटा प्रचार करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम शरद पवारांसह विरोधकांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांप्रती, गोरगरीबांप्रती भाजप सरकार बांधिल आहे, असेही अमित शहा म्हणाले.