मुंबई : वृत्तसंस्था
लंडनहून महाराष्ट्रात आणलेल्या शिवकालीन वाघनखांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाघनख वस्तुसंग्रहालयात ठेवण्यासंदर्भातील कार्यक्रमामध्ये विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नकली वाघांना वाघनखांचे महत्त्व कसे कळणार अशी टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांवर विवाद करुन नये. या रोगाचा सामना आजचा नाही.
छत्रपतींच्या काळातही तो होता. मात्र चाणाक्षपणे तो विरोध मोडून काढत शिवरांयांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. वाघनखे ही छत्रपती शिवारायांच्या पराक्रमाचे निदर्शक आहेत. त्यावर कोणी शंका घेऊन नये, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कोणत्या तरी इतिहासाशी काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी फडणवीस यांच्या विधानाचाही आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आली असून या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली मते मांडली. यावर संजय राऊत यांना पत्रकारांनी सवाल केला असता त्यांनी थेट शिंदे, फडणवीसांबरोबर अजित पवारांचा उल्लेख करत हे तिन्ही नेते नकली असल्याचा टोला लगावला. वाघनखांवरुन बोलताना उपहासात्मक टीप्पणी करत हे तिन्ही नेते ड्युप्लिकेट आहेत, असेही राऊत म्हणाले.