धरणगाव प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपुर्वी एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात गांजा वाहतूक प्रकरण चांगलेच गाजले होते. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला मध्यप्रदेशातील एनसीबीच्यापथकाने धरणगाव शहरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, जुलै २०२१ मध्ये मध्यप्रदेशातील इंदोर येथे गांजा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याचे या अधीच निष्पन्न झाले होते. याबाबत मध्यप्रदेशातील एनसीबी पथकाने चौकशीला सुरूवात केली होती. त्यानुसान मध्य प्रदेश एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी एरंडोल भागात येवून तस्करीवर नजर ठेवून होते. अशाच गांजा तस्करीचे कनेक्शन हे धरणगावतही आसल्याचे आढळून आल्याने एनसीबीच्यापथकाने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी विजय किसन मोहिते (रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल, ह.मु. धरणगाव एरंडोल रोड ता. जि
जळगाव ) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई एनसीबीचे दोन अधिकारी एक कर्मचारी यांनी केली आहे.