Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उसनवारी पैश्याचा वाद : जळगावातील तरुणाचा खून करून मृतदेह फेकला नदीत !
    क्राईम

    उसनवारी पैश्याचा वाद : जळगावातील तरुणाचा खून करून मृतदेह फेकला नदीत !

    editor deskBy editor deskJuly 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील तरुणाचा त्याच्याच मित्राने निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नदीपात्रात शोध घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात आज शुक्रवार दि. १९ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावात परतला होता. नितीनचे वडील हे हार्डवेअरच्या दुकानात मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, नितीन पाटील याच्या एका मुक्ताईनगर येथील मित्राने त्याच्याकडून १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते.

    उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्राला मागायचा. मात्र नितीन पाटीलचा हा तगादा त्याच्या मित्राला आवडला नाही. त्यामुळे संशयित आरोपी याने गुरुवारी दि. १८ जुलै रोजी नितीन पाटील याला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. “इकडे ये पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला.
    दरम्यान, त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्यासोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्‍या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्यांचा तपास सुरू आहे.

    मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच त्यांनी आज शुक्रवारी पहाटे २ वाजेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. दरम्यान तब्बल ९ तासांनी त्यांना मयत नितीन पाटीलचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.