काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराला साडेआठशे कोटीचे टेंडर देणाऱ्या कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना निलंबित करा
राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : शेततळे निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांना सेवेतून निलंबित करून निविदा प्रक्रियेची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरचंद्र पवार) ने दिला आहे.यासंदर्भात जळगाव महानगर युवक पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता भदाणे यांची भेट घेवून निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांच्या नियंत्रणात वाघूर धरण विभाग,जळगाव यांचे अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे शेततळे तयार केले जात आहे. या शेततळे कामांचा ठेका मिळवून देतो असे आमिष दाखवून वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांनी ४५ लाख रुपयांची अन्य साथीदार यांच्याशी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश जळगाव येथील न्यायालयाने दिलेले आहेत.कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन यांनी जिव्हीपीआर इंजिनिअर्स लिमिटेड या हैद्राबाद येथील कंपनीची शेततळे कामांची निविदा मंजूर करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला आहे. सदर कंपनी काळया यादीत असतांना काम दिले गेले आहे.