प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । महाविकास आघाडीने घाईघाईत विद्यापीठ कायद्यात बदल केले असून आता प्रत्येक विद्यापीठात प्र- कुलगुरू यांची नियुक्ती होणार आहे. नियुक्ती म्हणजे शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून विद्यापीठातील सर्व कामकाजामध्ये राजकीय ढवळाढवळ केली जाणार आहे. विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी धरणगाव तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर निषेध करण्यासाठी जात असतांना धरणगाव पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी कार्यकर्त्यांना जाण्यास प्रतिबंध करून नोटीस देऊन थांबवले
या प्रसंगी भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पवार, सरचिटणीस टोनी महाजन, सरचिटणीस सचिन पाटील, शहराध्यक्ष भूषण कखंरे, उपाध्यक्ष विशाल पाटील, गोपाल पांडे , योगेश ठाकरे, शहराध्यक्ष दिलीप माळी, सरचिटणीस कन्हैय्या रायपूरक , सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.