Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीला पिकअपची जबर धडक : पिता-पुत्र ठार
    क्राईम

    दुचाकीला पिकअपची जबर धडक : पिता-पुत्र ठार

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मालेगाव : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच मुंबई – आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाट्यावर पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले. बुधवारी (दि. १७) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

    मिळालेली माहितीनुसार, माजी नगरसेवक तथा शिक्षण मंडळाचे माजी सभापती शेख निसार शेख अकबर उर्फ राशनवाले (५५) व त्यांचा मुलगा शेख अबरार शेख निसार (२०) हे पिता-पुत्र नमाज पठणानंतर दुचाकीने सवंदगाव फाट्यावररून जात होते. त्यांना पाठीमागून भरधाव पिकअपने (एमएच ४८ सीबी ८६६३) धडक दिली. निसार यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी अबरारने वडिलांचा मोबाइल घेऊन कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अबरारला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचाही मृत्यू झाला. रोज पहाटे फजहरच्या नमाजनंतर दोघे पिता-पुत्र फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते.

    बुधवारी ऐन मोहरमच्या दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अबरारला किडनीचा आजार असल्याने त्याला डायलिसिससाठी मुंबई, पुणे येथे न्यावे लागत होते. दोघांवर येथील बडा कब्रस्तानात दफनविधी पार पडला. यावेळी शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.