Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन महिलांच्या हातातून मोबाईल लांबविला
    क्राईम

    दोन महिलांच्या हातातून मोबाईल लांबविला

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मोबाइल चोरीच्या घटना सुरूच असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या हातातून दुचाकीस्वारांनी मोबाइल हिसकावून नेले. ही घटना ७ जुलै रोजी आराधना कॉलनी व प्रभात कॉलनी भागात घडली, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, आराधना कॉलनीतील रहिवासी सोनाली प्रवीण वाणी (२५) या आराधना कॉलनीतून पायी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी वाणी यांच्या हातातील मोबाइल हिसकावला व पसार झाले. सोनाली वाणी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध १६ जुलै रोजी बीएनएस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इम्रान शेख फिरोज शहा (२२, रा. तांबापुरा) याच्यासह अन्य एका जणाला अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले करीत आहेत. दुसऱ्या एका घटनेत प्रभात कॉलनी परिसरातील विद्या नगरातून जात असलेल्या वैशाली प्रकाश चौधरी (६३) यांचा मोबाइल दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात १६ जुलै रोजी बीएनएस कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस आक्रमक; शेतकरी संघर्ष पदयात्रा

    March 9, 2026

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.