रावेर : प्रतिनिधी
तांदलवाडी येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले विठ्ठल नारायण पाटील यांचा २६ वर्षीय मुलगा सिद्धांत विठ्ठल पाटील हा अमेरिकेत कॅलिफोर्नियातील कॅडेन्स डिझाईन सिस्टीम या कंपनीत नोकरी करीत होता. तो मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये बेपत्ता झाला आहे. ही घटना दि.४ जुलै रोजी घडली.
सिद्धांत हा अमेरिकेतील मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्क मध्ये गेला होता. दि. ६ जुलै शनिवारी पहाडावर ट्रेकिंग करीत असतांना त्याचा दगडावरून पाय निसटला. आणि तो नदीच्या प्रवाहात पडला आणि खाडी मध्ये दिसेनासा होण्याआधी दोन वेळेस दिसला, असे त्याच्या प्रत्यक्षदर्शी मित्रांनी सांगितले. तो २०२० साली कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलीसमधून एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेला होता. २०२३ मध्ये तो कॅडेन्स मध्ये रुजू झाला होता