प्रतिनिधी प्रविण पाटील : तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी यांनी राहत्या घरात विषारी द्रवण शेवन केले होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विटनेर येथील गोकुळ पांडुरंग वराडे( वय ४९) हे 14 जानेवारी शुक्रवार रोजी आपल्या घरच्या शेतात फवारणीसाठी गेले होते सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास त्यांनी विषारी द्रवण शेवन केले होते त्यानंतर त्यांना उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना काल रात्री रविवार १६जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली
मयत गोकुळ वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून सन २०२०/२०२१मध्ये शेतासाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले आहे गोकुळ वराडे यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात गट नंबर २९९/१/२/१अ/१हि २०आर व २९९/१/२/अ/१/२हि ६०आर असे एकूण ८० आर जमीनीचे क्षेत्र आहे त्यांनी कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. आज जळगाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस कॉ.प्रदिप पाटील हे करीत आहेत