जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा (क्र. एमएच १९, एपी ५०७६) शोध घेत असताना ते रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याने चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.
त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पोउनि राहुल तायडे, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांनी मंगळवारी (१६ जुलै) रमेश सोनवणे याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे.


