जळगाव : प्रतिनिधी
शेतात कामाला जात असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अलका विजय कोळी (३६, रा. श्रीराम चौक, असोदा रोड) या ठार झाल्या. ही घटना मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ८:३० वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अलका कोळी या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती विजय कोळी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत, तर त्या शेतमजुरी करायच्या, मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी इतर महिलांसोबत त्या शेतात जात असताना आसोदा रेल्वे गेटजवळ रेल्वेरूळ ओलांडताना अचानक धावत्या रेल्वेचा त्यांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.