• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : ३४ दुचाकी, दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
July 15, 2024
in क्राईम, जळगाव, बोदवड
0
बापरे : ३४ दुचाकी, दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना बोदवड पोलिसांनी भुसावळ व वरणगाव शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बोदवड शहरातील विजय पुंडलिक माळी यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ५१८७) ही चोरी झाल्याची घटना १९ जून रोजी दुपारी घडली होती. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी भुसावळ शहरातील जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे वय-३१ याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बोदवड पोलिसांनी जितेंद्र सोनवणे याला अटक केली. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने ही चोरी त्याचा सहकारी रुपेश ज्ञानेश्वर चौधरी रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव ता. भुसावळ यांच्यासोबत केल्याचे कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रुपेश चौधरी याला वरणगाव शहरातून अटक केली. दरम्यान दोघांची कसुन चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या भागात जाऊन त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी बोदवड पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंकुश जाधव, गुन्हे शोध पथकातील पोउनि सुधाकर शेजोळे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गुरचळ, शशिकांत शिंदे, पोलीस नाईक शशिकांत महाले, भूषण सोनवणे यांनी केली आहे.

Previous Post

राज्यात मोठी चर्चा : मंत्री भुजबळ घेणार शरद पवारांची भेट

Next Post

रेस्क्यू ऑपरेशनचा थरार : अखेर १० पर्यटकांची गडावरून सुटका !

Next Post
रेस्क्यू ऑपरेशनचा थरार : अखेर १० पर्यटकांची गडावरून सुटका !

रेस्क्यू ऑपरेशनचा थरार : अखेर १० पर्यटकांची गडावरून सुटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !
क्राईम

खळबळजनक : तरुणीची छेड काढत तिघांनी लुटले !

June 9, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील व्यक्तींना थकित पैसे वसूल करण्यास योग्य वेळ !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group