Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात मोठी चर्चा : मंत्री भुजबळ घेणार शरद पवारांची भेट
    राजकारण

    राज्यात मोठी चर्चा : मंत्री भुजबळ घेणार शरद पवारांची भेट

    editor deskBy editor deskJuly 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापेलला असताना या भेटीत हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असेल असा तर्क लावला जात आहे. विशेष म्हणजे भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    कारण रविवारी बारामतीमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत आहेत. तसेच बारामतीमधून फोन आला म्हणून विरोधी पक्षनेते मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत”, असे अनेक गंभीर आरोप भुजबळांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी ते पवारांच्या भेटीला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यसभा रणसंग्राम पेटला; पवारांच्या नावावरून आघाडीत खळबळ, महायुतीचा ‘पाचवा’ प्लॅन तयार?

    March 4, 2026

    ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र रंगला

    March 3, 2026

    सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा रणसंग्राम!

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.