Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाच्या धडकेत ; तरुण ठार तर दोन गंभीर जखमी
    क्राईम

    भरधाव वाहनाच्या धडकेत ; तरुण ठार तर दोन गंभीर जखमी

    editor deskBy editor deskJuly 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील कॉलेज चौकात शनिवारी मध्यरात्री १:०० वाजेच्या सुमारास भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला.

    सविस्तर वृत्त असे कि, संतोष शिवसिंग परदेशी (३७, गाळण, ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मार्केटिंग क्षेत्रातील कंपनीत काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होते. पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शनिवारी मध्यरात्री १२:०० वाजेच्या सुमारास ते कल्याण स्टेशनवरून पाचोरा रेल्वे स्टेशनवर उतरले. स्टेशनवर उतरल्यानंतर गाळण येथे घरी जाण्यासाठी त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. या दचाकीस्वारासोबत जात असताना कॉलेज चौकात आल्यावर भरधाव अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

    या जबर धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. यातील संतोष परदेशी यांच्यावर जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुचाकीस्वार हे कृषी अधिकारी असल्याची माहिती मिळत असून, त्यांच्यावर पाचोऱ्यातीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जळगावात संतोष परदेशी यांचा उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रविवारी दुपारी १:०० वाजता त्यांच्यावर पाचोरा तालुक्यातील गाळण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, संतोष परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.