गहू, ज्वारी,मका उत्पादनावर आहे शेतकर्यांची मदार
जळगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यात रब्बी हंगामांतर्गत गहू, ज्वारी, बाजरी, मका यासह रब्बी वाणांची २लाख ३४हजार १०४ हेक्टर सरासरी ११७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाच्या सुरूवातीस बेमोसमी पावसाने तुरळक ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली होती. परंतु या बेमोसमी पावसाचा काही अंशी रब्बी पिकांच्या पेरणीस फायदाच झाला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा दिडपटीने झालेल्या अती पावसामुळे कपाशी, ज्वारी बाजरी आदी पिके हातची गेली तर पुर वा अतीपावसामुळे सुमारे ६ ते सात हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
त्यात ज्वारी डिसकलर होउन कपाशीची बोंडे काळी पडल्यान उत्पादनावर मोठया प्रमाणात तूट आली असल्यासचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत जिल्हयात बर्यापैकी गुलाबी थंडीचे वातावरण असून हवामान स्वच्छ आणि कोरडे असून तापमान देखिल १३ ते २३ अंशादरम्यान आहे. या थंड वातावरणाचा गहू हरबरा, भूईमूग यासह अन्य रब्बी पिकांच्या वाढीस बर्यापैकी फायदा असून बरीच पिके जोमदार वाढीस लागली असल्याचे चित्र आहे. जिल्हयात ७.५० हेक्टर लागवडीयुक्त क्षेत्रापैकी २लाख ३४ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी वाणांची लागवड झाली असून त्यात ४५हजार ५३२ हेक्टरवर गहू, ३६हजार २६९ हेक्टरवर ज्वारी, ८३हजार २६७ हेक्टरवर हरबरा, ६२हजार २६७ हेक्टवर मका, ३हजार ५९८ हेक्टरवर सूर्यफूल असे एकूण २ लाख ३४हजार १०४ हेक्टर क्षेत्रांवर रब्बी वाणांची लागवड झाली आहे.
सर्वात जास्त रब्बी हंगामातर्गत १०९ टक्के ज्वारी वाणाची लागवड जळगाव तालुक्यात तर सर्वात कमी यावल तालुक्यात झाली आहे. गहू या वाणाची लागवड चोपडा तालुक्यात सर्वात जास्त असून सर्वात कमी जळगाव तालुक्यात आहे. ज्वारी व मका या वाणांची लागवड रावेर तालुक्यात १३हजार हेक्टरहून अधिक आहे. त्याखालोखाल अन्य पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुका परिसरात मका वाणाची लागवड असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.