पारोळा : प्रतिनिधी
नाशिक येथून मुलाची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आटोपून घरी असलेल्या परतत पित्याचा शुक्रवारी पारोळ्याजवळ अपघात झाला. चंद्रकांत अरुण चौधरी (वय ४६) असे या इसमाचे नाव आहे. पारोळा येथे चौधरी कारमधून खाली उतरले. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, चौधरी हे पत्नी आणि मुलगा कल्पेश याच्यासह नाशिक येथे प्रवेश प्रक्रियेसाठी गेले होते. दि. ७ रोजी नाशिकहून परत येत असताना चौधरी हे वाहन थांबवून खाली उतरले. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दि. १२ रोजी चंद्रकांत चौधरी हे आपल्या चार चाकी वाहनाने पत्नी व मुलगा कल्पेश याच्यासह नाशिक येथे दि. ६ रोजी मुलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी गेले होते. दि. ७ रोजी नाशिक येथून परतत असताना रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान चौधरी परिवार पारोळा येथे रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून चंद्रकांत चौधरी वाहनातून खाली उतरले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
त्यात गंभीर जखमी झाले. तातडीने मुलगा कल्पेशा याने त्यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान दि. १२ शुक्रवारी मध्यरात्री चंद्रकांत चौधरी यांचा मृत्यू झाला.या अपघातप्रकरणी जळगाव येथील रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत चौधरी यांचे फैजपूर येथे सलून दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ व मुलगा असा परिवार आहे.