जळगाव : प्रतिनिधी
फैजपुर पोलीस ठाण्याचा हद्दीत २ ठिकाणी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लांबाविणाऱ्या दोन संशयित आरोपींना फैजपूर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजपुर पोलीस ठाण्यात २४ मे आणि १८ जून रोजी असे वेगवेगळे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी शिरपूर पोलिसांनी काही आरोपींना घरपोडीच्या गुन्ह्यात अटक केलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे संशयित आणि आणि हे आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरपूर येथे जाऊन राजेद्रसिंग उर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय-२६, ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला वय-२३ दोघे रा.उमर्टी ता.वरला जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश दोघी संशयित आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरबोडी केल्याचे कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमल जप्त केला आहे. त्यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, रावेर पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, यावल पोलीस स्टेशन येथील २ गुन्हे, अडावद पोलीस स्टेशन येथील १ गुन्हा असे एकूण ७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश वाघ, पोउनि मैन्नुद्दीन सय्यद, पोहेकॉ रविंद्र मोरे, पोहेकॉ अनिल पाटील, पोहेकॉ मोती पवार, पोहिकॉ विकास सोनवणे, पोहेकॉ बाळु भोई, पोना विशाल मोहे, पोकॉ दिनेश भोई, पोकॉ भुषण ठाकरे, पोकॉ मो.जुबेर शेख या पथकाने केली आहे.