Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतापजनक : भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक !
    क्राईम

    संतापजनक : भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक !

    editor deskBy editor deskJuly 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी सुरु झाली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू त्या उरूसच्या ठिकाणी जाण्यासाठी बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. सुमारे अर्धा तास दगडफेक झाल्याचे कळते आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘काँग्रेसमध्ये नाही, आमच्यात या’; शरद पवार गटाला ‘या’ नेत्याने दिली खुली ऑफर !

    June 15, 2026

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम?; ठाकरे गटाचे सर्व ९ खासदार एकजूट असल्याचा दावा !

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.