• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना आज नवा आदेश जारी

editor desk by editor desk
July 13, 2024
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना आज नवा आदेश जारी

जळगाव : प्रतिनिधी

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतील स्थान वाढावे यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी शासनाने दि. १२ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्या सोबतच या योजनेचे यशस्वी अर्ज भरणारे अंगणवाडी सेविका, एनयुएलएम यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सीटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप / पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर ५० रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार कुटुंबाची व्याख्या ‘कुटुंब’ याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले / मुली अशी केली आहे. अनेकदा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्या सोबतच ज्या महिलांचे पोस्टात बँक खाते असेल त्यांचे पोष्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरणात येणार आहे. त्या सोबतच सदर योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, एनयुएलएम यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख व आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पीएफएमएस-डीबीटी प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र/राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (पीएम किसान, पोषण, पीएम स्वनिधी, जेएसवाय, पीएम एमव्हीवाय) जे लाभार्थी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील, त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी, आधार ऑथेंटीकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्याना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा, असेही आदेशित करण्यात आले आहे. राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

शाळेच्या मैदानात आली चक्कर, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post

गावठी पिस्तूल घेऊन दहशत : एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

Next Post
गावठी पिस्तूल घेऊन दहशत : एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

गावठी पिस्तूल घेऊन दहशत : एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group