Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : हनी ट्रॅप’, मारहाण, खंडणी अन महिलेला घेतले ताब्यात
    क्राईम

    धक्कादायक : हनी ट्रॅप’, मारहाण, खंडणी अन महिलेला घेतले ताब्यात

    editor deskBy editor deskJuly 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाला जेवणातून गुंगीचे औषध देत त्याचे आक्षेपार्ह फोटो काढत खंडणी उकळणाऱ्या महिलेला रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘हनी ट्रॅप’ करणारी ही महिला १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत गेली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. तिने व्यावसायिकाला आपण सीआयडी अधिकारी तर पती रेल्वेत टी.सी. असल्याचे सांगितले. ७ मार्च रोजी धुळे येथे ती व्यावसायिकाला भेटली. तेथे जेवणात गुंगीचे औषध देत एका फ्लॅटवर घेऊन गेली. याठिकाणी व्यावसायिकाचे आक्षेपार्ह फोटो काढत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, या महिलेने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच ‘तू माझ्यासोबत रिलेशनशिप सुरू ठेव, नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल’, अशी धमकी दिली. याशिवाय गरोदर असल्याचे सांगत त्या महिलेने व्यावसायिकाकडून तीन लाख रुपये उकळले.

    काही दिवसांपूर्वी या महिलेने व्यावसायिकाच्या घरी जाऊन १५ लाखांची मागणी केली. तसेच व्यावसायिकासह त्यांच्या पत्नीला लोखंडी सळईने मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची चेन व त्यांच्या पत्नीचे ३० ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. शेजाऱ्यांनी या व्यावसायिक दाम्पत्याला त्या महिलेच्या तावडीतून सोडवत खासगी रुग्णालयात दाखल केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.