जळगाव : प्रतिनिधी
हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना जळगाव येथील तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना चोपडा येथील श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घडली. मयूर राजेंद्र शिंदे (वय ३१, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मयूर हा बुधवारी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त चोपडा येथे आला होता हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी मयूर याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉ. सागर पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शेषराव तोरे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, भाऊ, मुले असा परिवार आहे.



