• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नोकरी नसल्याने तरुणाने संपविली जीवनयात्रा

editor desk by editor desk
July 11, 2024
in क्राईम, जळगाव
0
नोकरी नसल्याने तरुणाने संपविली जीवनयात्रा

जळगाव : प्रतिनिधी

खूप प्रयत्न करुनही नोकरी मिळत नसल्याने तणावात असलेल्या नीलेश सुरेश सोनवणे (२५, रा. अयोध्या नगर) या तरुणाने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (९ जुलै) रात्री घडली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेला नीलेश सोनवणे हा तरुण आई-वडील व मोठ्या भावासह अयोध्यानगरात राहत होता. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. परंतू नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता. मंगळवारी (९ जुलै) त्याचे आई-वडील व भाऊ हे सर्व इगतपुरी येथे लग्नाला गेले होते. त्यामुळे नीलेश हा घरी एकटाच होता. त्या वेळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

रात्री १० वाजता त्याचे मित्र घरी पोहचले त्या वेळी नीलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी याविषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आई-वडील व मोठा भाऊ रुग्णालयात पोहचले. नीलेशचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों अतुल पाटील करीत आहेत.

Previous Post

एलसीबीची कारवाई : घरफोडी करणाऱ्यासह दागिने घेणाऱ्याला पकडले

Next Post

बसची जबर धडक : पाच वर्षीय बालिका जागीच ठार

Next Post
बसची जबर धडक : पाच वर्षीय बालिका जागीच ठार

बसची जबर धडक : पाच वर्षीय बालिका जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group