Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर धावत्या ट्रेलरच्या कॅबिनमध्ये अचानक आग
    क्राईम

    महामार्गावर धावत्या ट्रेलरच्या कॅबिनमध्ये अचानक आग

    editor deskBy editor deskJuly 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राष्ट्रीय महामार्गावर तरसोद फाट्यानजीक धावत्या ट्रेलरच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागून त्याने पेट घेतला. ही घटना बुधवारी (१० जुलै) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. आग लागताच चालकाने उडी घेतल्याने तो बचावला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यानजीक भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रेलरच्या (आरजे ५२, जीए ३१८१) कॅबिनमध्ये अचानक आग लागली. ही आग लागताच चालकाने तातडीने ट्रेलर जागेवरच थांबविला व बाहेर पडला. या विषयी काही नागरिकांनी नशिराबाद पोलिस व जळगाव मनपाच्या अग्नीशमन विभागाला माहिती दिली. एक बंब घटनास्थळी पोहचला व आग विझविण्यात आली. नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहचले. कॅबिनमधील वायर जळाल्यामुळे आग लागली असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिथे सनई वाजणार होती… तिथेच पसरली शोककळा; अपघातात पित्याचा अंत

    March 14, 2026

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.